महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उस्मानाबाद दि.३ (प्रतिनिधी) - रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या १२ व्या बैठकीत सह्याद्री अतिथीगृहात दि.३ एप्रिल रोजी दिले. 

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळलेच पाहिजेत, वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात. ब्लॅक स्पॉट कमी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. तर अपघात होण्यास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी हटवावीत. रात्री गस्तीचे प्रमाण वाढविण्यात यावेत व अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना लवकर मदत मिळण्याच्या दृष्टीने ट्रॉमा केअर सेंटरमधील सुविधा, प्रसंगी एअर ॲम्ब्युलन्स सुविधा त्वरित उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.  यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !