धनंजय सावंत यांच्या हस्ते सुंदर माझा दवाखाना मोहीमेचा शुभारंभ
धनंजय सावंत यांच्या हस्ते सुंदर माझा दवाखाना मोहीमेचा शुभारंभ
उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) - भूम तालुक्यातील पाथरुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुंदर माझा दवाखाना मोहीमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दि.७ एप्रिल रोजी करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. राज गलांडे, बप्पा जाधव, शिवसेना भूम तालुका समन्वयक वैजिनाथ म्हमाने, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह डॉक्टर, अधिपरिचारीका, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.