पखरुड येथील सरपंच कांबळे यांच्यासह इतरांचा शिवसेनेत प्रवेश
पखरुड येथील सरपंच कांबळे यांच्यासह इतरांचा शिवसेनेत प्रवेश
उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) - भूम तालुक्यातील पखरुड येथील सरपंच संजीवनी कांबळे यांच्यासह उपसरपंच व सदस्यांनी पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पखरुड येथील सरपंच संजीवनी कांबळे, उपसरपंच दादाराव चव्हाण, सदस्य शहाजी चव्हाण, सारिका नाईक, बालाजी नाईक यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय मोहिते, तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, युवासेना जिल्हा समन्वयक प्रविण देशमुख, परंडा तालुकाप्रमुख राहुल डोके, माजी सरपंच विशाल ढगे, समाधान सातव आदी उपस्थित होते.