भ.महावीर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणूक

भ.महावीर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणूक

उस्मानाबाद दि.३ (प्रतिनिधी) - भगवान महावीर यांची जयंती (कल्यानक)‌ निमित्त शहरातून भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात दि.३ एप्रिल रोजी काढण्यात आली.
उस्मानाबाद येथे सकाळी ७ वाजता मंगला चरण करून संजय देशमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नीलम अजमेरा, संतोष शहा, सुहास हिंडाने, प्रवीण बोपलकर, राजाभाऊ जगधाने, दिलीपचंद बोराणा आदी उपस्थित होते. सकळ जैन समजाचे अध्यक्ष उल्हास चाकवते यांनी यथोचित सत्कार केला. आ. पाटील यांनी भ. महावीरांच्या संदेशाचे पालन केल्यास कोणीही दुःखी राहू शकत नाही. सत्य, अहिंसा, अचौर्य, ब्रम्हचर्य व अपरिग्रह या भ. महावीरांच्या संदेशाचे विश्लेषण ब्रम्हचारी अजय  यांनी केले. यानंतर शोभा यात्रेचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, तुषार निंबाळकर, प्रदीप मुंडे हे मान्यवर उपस्थित होते. शोभा यात्रेमध्ये ढोलताशा पथक हे आकर्षण ठरले. ढोलताशा पथकाचे प्रमुख प्रशांत येनेगुरे, सागर दुरुगकर व भूषण पलसे यांनी पथकाचे यशस्वी संचलन केले. शोभा यात्रेची सुरुवात आदिनाथ जैन मंदिर गुजर गल्लीतून प्रारंभ होऊन मारवाड गल्ली, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळा मारुती चौक, माऊली चौक येथून परत गुजर गल्ली येथे विसर्जन करण्यात आले.  शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी अतुल अजमेरा, सुदेश फडकुले, हेमंत पांडे,अतुल कांबळे, सुनील वायकर, अमित गांधी, मनोज चाकवते, मनोज कोचेटा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !