पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्यातील दानशूरपणा पुन्हा आला समोर अडचणीत सापडलेल्या कुटुंबाने मदत मागताक्षणीच दिला धनादेश प्रा डॉ तानाजीराव सावंत अतिशय संवेदनशील व हळव्या मनाचा प्रत्यक्ष देव माणूस
पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्यातील दानशूरपणा पुन्हा आला समोर
अडचणीत सापडलेल्या कुटुंबाने मदत मागताक्षणीच दिला धनादेश
प्रा डॉ तानाजीराव सावंत अतिशय संवेदनशील व हळव्या मनाचा प्रत्यक्ष देव माणूस
अडल्या-नडल्यांचा खरा पाठीराखा
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - राजकीय मंडळी जनतेला सहसा आभाळभर आश्वासनांच्या घोषणारुपी पुराच्या लोटामध्ये ढकलून देतात. कृती मात्र रिमझिम पावसासारखीच असते. त्यामुळे जनता अशा नेते मंडळींच्या वागण्यामुळे अक्षरशः वैतागून व त्रासून जाते. मात्र याला अपवाद ठरले ते दानशूर म्हणून सर्वत्र परीचित असलेले, नावारूपाला आलेले व सतत अडीअडचणीत सापडलेल्या गोरगरीबांना सतत अत्यावश्यक मदत करणारे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत. महाराष्ट्र दिन असल्यामुळे राज्यभर झेंडा वंदन, आदींसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जनतेच्या अडीअडचणी व त्यांची विचारपूस पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत जिल्हाधिकारी समवेत करीत होते. यावेळी वडिलांना हाडाचा कर्करोग झाला असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढील खर्च झेपत नसल्याने तो इलाज थांबविण्यात आला असल्याची कैफियत कॅन्सरग्रस्त संजीव कुमार पाटील (वय ५५ वर्षे) यांच्या कन्येने जड अंतकरणाने सांगत निवेदनाद्वारे सर्व कैफियत सावंत यांच्यासमोर मांडली. मंत्री सावंत यांनी देखील क्षणाचाही विलंब न लावता सचिवांना पुढील सर्व आजार मोफत करण्यासाठी सूचना तर दिल्याच. विशेष म्हणजे आजपर्यंत त्यासाठी उपचार करण्यासाठी खर्च केलेले दोन लाख रुपये तात्काळ धनादेशाद्वारे दिले. त्यामुळे त्यांच्यातील दातृत्वपणाची वृत्ती पुन्हा नागरीकांना याच अनुभवता आली.
कॅन्सरग्रस्त संजीव कुमार पाटील (वय ५५ वर्षे) यांना हाडाच्या कर्करोगाचे निदान झाले. घरात पत्नी २ मुली व धाकटा मुलगा असा ५ जणांचा परिवार. थोरली प्राध्यापिका असून ती तासिका तत्त्वावर ज्ञानदानाचे काम करीत आहे. मानधन कमी त्यातच तिच्यावरच वडिलांच्या औषध उपचारांची पूर्ण जबाबदारी आली. औषध उपचारासाठी लाखांच्या पटीत खर्च तो करायचा कसा ? करण आर्थिक परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळे ते कुटूंब चिंताग्रस्तावस्थेत सापडले. सर्व मार्ग खुंटल्यामुळे निराश झालेल्या मुलीला महाराष्ट्र दिनी पालकमंत्री सावंत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ती पालकमंत्र्यांना आपली कैफियत मांडावी व यावर मार्ग काढावा या आशेने ती जिल्हाधिकाऱ्यांच्या रंगनाथ उभारलेल्या मंडपामध्ये सकाळीच येऊन बसली. पालकमंत्र्यांनी झेंडावंदन कार्यक्रम संपल्यानंतर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधत असताना या मुलीने आपली कैफियत मांडली. मात्र गरिबी काय असते त्यामध्ये येणारे अनेक प्रसंग स्वतः पालकमंत्री सावंत यांनी स्वतः अनुभवलेले असल्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वीय सहाय्यकास यापुढील सर्व उपचार मोफत करण्यासाठी सूचना केल्या. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर या उपचारासाठी आजपर्यंत किती खर्च आला असे विचारत खर्च झालेले दोन लाख रुपये तात्काळ धनादेशाद्वारे पाटील यांच्या पत्नी व मुलगी यांच्याकडे सुपुर्द केले. त्यामुळे सावंत यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्या मायलेकींनी आपल्या डोळ्यांमध्ये दाटलेल्या आसवांना वाट मोकळी करून दिली.
खरोखरच सावंत हे अडचणीत सापडलेल्या गोरगरिबांना देव माणसासारखेच मदतीला धावून जात आहेत. त्यामुळे आजपर्यंत कोणी प्रत्यक्ष देव जरी पाहिलेला नसला तरी त्यांच्या मदत रूपाने ते देवच असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करू लागलेली आहे. यावेळी मदतीचा धनादेश देताना जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना नेते अनिल खोचरे, धाराशिव तालुकाप्रमुख अजित मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्वीय सहाय्यक सोमनाथ रेड्डी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.