धाराशिव जिल्ह्यातील नगर परीषदांसाठी ७३८ कोटींचा निधी मंजूर पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश

धाराशिव जिल्ह्यातील नगर परीषदांसाठी ७३८ कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश

धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) -  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या नियमित पाठपुरावा आणि प्रयत्नांना यश मिळाले असून आज राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील नगर परीषदांसाठी ७३८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री डॉ.सावंत यांनी दि.२६ जानेवारी रोजी धाराशिव नगर परीषद व जिल्हयातील नगर परीषदांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्याबाबत  जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी (नगर परीषद) यांना सूचना देऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देशित  केलेले होते. त्यानुसार प्रशासनाने भूम, परंडा, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग व उमरगा नगर परीषदांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर) अहवाल शासनाकडे सादर केला.
हा प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत डि.पी., रस्त्याचे सिमेंट क्रॉक्रीट रस्ते  व पक्की नाली पध्दतीने बांधकाम करणे अशा स्वरुपाचे आहे. त्यानुसार सविस्तर अहवाल शासनाकडे दाखल झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे यासदंर्भात वारंवार पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून यापूर्वीच भूम व परंडा या नगर परीषदांना अनुक्रमे ११४.६५ व ९२.५२ कोटी रुपये शासनाद्वारे मंजूर करण्यात आले आहेत. तर
उर्वरित नगर परीषदांसाठी दि.१८ मे रोजी राज्यस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. त्या  बैठकीमध्ये धाराशिव नगर परीषदेसाठी १४६.६६ कोटी रुपये, तुळजापूर नगर परीषदेसाठी १५८ कोटी रुपये, नळदुर्ग नगर परीषदेसाठी ९७.६७ कोटी, उमरगा नगर परीषदेसाठी १२८.५२ कोटी रुपये असे एकूण ७३८.२ कोटी रुपयांचा महत्वकांक्षी प्रकल्प मंजुर झाला आहे.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !