पालकमंत्री डॉ प्रा तानाजीराव सावंत यांनी झाडबुके कुटुंबाचे स्विकारले पालकत्व

पालकमंत्री डॉ प्रा तानाजीराव सावंत यांनी झाडबुके कुटुंबाचे स्विकारले पालकत्व

परंडा दि.४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील मुगांव  येथील काॅग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष तथा विधीज्ञ धनंजय महादेव झाडबुके यांचा गेल्या वर्षी कोरोना या गंभीर आजाराने उपचार दरम्यान मृत्यू झाला. उघड्यावर आल्याने पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी झाडबुके यांच्या मुलांचे शिक्षण व त्यांच्या पत्नीस संस्थेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे लावण्याचे आश्वासन देत कायमस्वरूपी पालकत्व स्विकारले आहे.
धनंजय महादेव झाडेबुके
त्याच्या पाश्चात्य दोन लहान  मुले व पत्नी असा परीवार आहे. परंतू त्यांच्या जाण्याने घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची बनली आहे. शेती तुटपुंजी त्यात‌ लहान मुलांचे शिक्षण व घर खर्च भागवायचा कसा ? दुसरे कुठलेही उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे आपल्या मुलांचा शिक्षण व घर खर्च पेलण्यासाठी त्या हतबल झाल्या. त्यामुळे त्यांनी आपली परिस्थिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांना भेटून सांगितली. या कुटुंबाचे दुःख पाहून विलंब न करता लगेचच मंत्री सावंत यांनी या दोन्ही मुलांची शिक्षणासाठी कायमस्वरूपी पालकत्व स्विकारले. तसेच झाडबुके यांच्या पत्नीस कायमस्वरूपी नोकरी लावण्यासह आम्ही कायम तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहू असे आश्वासन यांनी दिले. तसेच सावंत यांनी त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भैरवनाथ कारखान्याचे संचालक धनंजय सावंत यांना फोन करून लागेल ती आर्थिक मदत व मुलांचे शिक्षण व झाडबुके यांच्या पत्नी यांच्या नोकरीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे तात्काळ घेऊन त्यांना लागेल ती मदत करण्याचे सांगितले. तर धनंजय सावंत यांनी तात्काळ मुगाव येथे त्यांच्या घरी जाऊन झाडबुके यांच्या मुलांचे शिक्षण व नोकरीस लावण्याचे आश्वासन दिले. झाडबुके यांचा परीवार व त्यांच्या सर्व नातेवाईकांनी मंत्री सावंत व धनंजय सावंत यांचे आभार मानले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !