परंडा भुईकोट किल्ल्याच्या साफसफाईसाठी मावळे सरसावले

परंडा भुईकोट किल्ल्याच्या साफसफाईसाठी मावळे सरसावले

परंडा दि.६ (प्रतिनिधी) - मराठवाड्यातील ऐेतिहासीक ठेवा असलेल्या परंडा येथील भुईकोट किल्ला परिसरात साफसफाई करण्यात येत आहे. 
या किल्याचे संवर्धन व्हावे यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पुढाकाराने शेकडो मावळ्यांसह किल्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.  ही स्वच्छता मोहीम दि.५ ते ९ मेपर्यत राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी नगर परिषदच्या मुख्यधिकारी मनिषा वडेपल्ली, जिपचे माजी सभापती दत्ता साळुंके,  माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, माजी बांधकाम सभापती दत्तात्रय मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे, शिवसेना शहर प्रमुख दत्ता रणभोर, वैभव पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !