हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन गणेश नगर येथे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
             पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये गोरगरीब जनतेला मोफत औषध उपचार मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून नवीन सहा रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी येत्या काही दिवसांमध्ये नवीन ९ रुग्णवाहिका   उपलब्ध करुन देण्यात येतील.
            यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, जिपचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखाना ही संकल्पना मांडली. तिचा आपण अल्पावधीत विस्तार केला. आज आपण माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात सुमारे ४ लाख ३९ महिलांची तपासणी पूर्ण केली असून त्यांच्यावर ७० टक्के उपचार देखील पूर्ण केले आहेत. सुदृढ बालक योजनेचीही यशस्वी अमंलबजावणी सुरु आहे. मेळघाटातील कुपोषणमुक्ती याबाबत आपण प्रभावीपणे काम करत आहोत. औषध प्राधिकरणाची निर्मिती, जनआरोग्य योजना तसेच आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर देत आहोत. संपूर्ण राज्यातील जनतेच्या आरोग्याची सुखरूपता हा मुख्यमंत्री महोदयांचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अथकपणे प्रयत्नशील आहे. त्यातूनच आज आपण वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहोत. या योजनेतील दवाखान्यांची संख्या लवकरच वाढवली जाईल असे त्यांनी सांगितले.
                             

 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !