शासकीय तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरु नेतेमंडळींना इच्छाशक्तीच नाही ! मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची संयुक्त बैठक आवश्यक
शासकीय तत्वावर वैद्यकीय महाविद्यालय सुरु नेतेमंडळींना इच्छाशक्तीच नाही !
मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची संयुक्त बैठक आवश्यक
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - अनंत अडचणींवर मात करीत प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महत प्रयत्नांच्या जोरावर धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आलेले आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या बहुतेक सुविधा उपलब्ध करून देण्यास राजकीय मंडळींची इच्छाशक्तीच नसल्याने या महाविद्यालयाचे पुढील भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले वस्तीगृह व इतर मूलभूत मात्र तितक्याच अत्यावश्यक असलेल्या जागेचा प्रश्न देखील केवळ आणि केवळ राजकीय हेवेदाव्यापोटीच आजपर्यंत रेंगाळत नव्हे सडवित ठेवलेला आहे. त्यामुळे राजकीय मंडळी खरोखरच हे प्रश्न सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार की केवळ भावनिकतेची लाट निर्माण व्हावी यासाठीच प्रयत्न करणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांनी गेल्या वर्षभरापासून अपूर्ण अवस्थेतील असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे मात्र पत्र देऊन त्याचा प्रस्तावच देण्यात आलेला नाही नॅशनल मेडिकल कौन्सिल एनएमसी दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी मान्यता. त्यानंतर येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. शासकीय प्रवेश प्रक्रियातून निवड झालेल्या १०० विद्यार्थ्यांची बॅच येथे डिसेंबरमध्ये सुरू झाली आहे. एनएमसीच्या मान्यतेने महाविद्यालयाच्या परिसरातच या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली असून मात्र ही सोय तात्पुरती आहे. तर जूनमध्ये दुसरी बॅच निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार असून जुने १०० व नवीन १०० अशी एकूण २०० विद्यार्थ्यांची संख्या होणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय एनएमसीच्या नियमावलीनुसार वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीसरातच करण्याची निर्देश आहेत. जर २०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय झाली नाही तर नियम व शर्तीचा भंग होऊ शकतो. जर नियमांचा भंग व उल्लंघन झाले तर एनएमसी ची पुन्हा पडताळणी होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जागा कमी होण्याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील वर्षाची पूर्ण बॅचे सुरू होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. जर असा प्रकार झाला तर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे धाराशिवकारांचे स्वप्न पुन्हा भंगण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागलेले आहेत. महत प्रयत्नांनी सुरु झालेले वैद्यकीय महाविद्यालय अडचणीत आले तर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ती बाब अतिशय घातक ठरु शकते.
.................................................................
सार्वजनिक बांधकाम विभागाला या महाविद्यालय परिसरात ११ वर्षापूर्वी बांधकाम सुरू केलेल्या मात्र अर्धवट अवस्थेत असलेल्या तीन इमारतींचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करण्यास विलंब होत आहे. कारण या इमारतींचे ११ वर्षांपूर्वीच्या संचिका शोधून आतापर्यंत किती कामे झाली आहेत ? याची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे यापैकी एका इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. मात्र ते वापरासाठी हस्तांतरित केले नसल्यामुळे त्यातील काही साहित्य चोरी गेलेले आहे. या तीन इमारतीमध्ये पुढील वर्षात येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होऊ शकते. मात्र ते बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे.
.................................................................
३ मंत्र्यांची एकत्रित बैठकीसाठी पुढाकार घेणार कोण ?
या महाविद्यालयासाठी शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय आयटीआय व जलसंपदा विभागाची ४९ एकर जागा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांची संयुक्त बैठक होणे आवश्यक आहे. शासकीय तंत्रनिकेतन शेजारी आयटीआय ही संस्था हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली बैठक घेण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून या बैठकीसाठी हिरारीने पुढाकार कोण घेणार ? असाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. शिल्पा डोमकुंडवार अधिष्ठाता
.................................................................
धर्मशाळा देखील वस्तीगृहासाठी उपयोगी !
या परिसरात धर्मशाळा असून सध्या त्यामध्ये स्नानगृह, शौचालय यासह सर्व सोयींनीयुक्त अशा खोल्या आहेत. मात्र ती सध्या वापरा विना बंद असून ती ताब्यात घेऊन त्याची किरकोळ दुरुस्ती केल्यास ती विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह म्हणून वापरात येऊ शकते. यामधील काही खोल्यांचा वापर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचा कारभार हाकण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती करून ती तात्काळ वापरात आणणे आवश्यक आहे.
.................................................................
प्रस्ताव पाठविण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ शिल्पा दोमकुंडवार यांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र संबंधित विभागात ११ वर्षांपूर्वी महिला रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतींवर किती खर्च करण्यात आले आहेत. तसेच कोणकोणती कामे अपूर्ण आहेत ? याची माहिती शोधण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नसल्यामुळे ती माहितीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यास तात्काळ प्रशासकीय मान्यता मिळेल असा परिपूर्ण प्रस्ताव कसा व केव्हा पाठविणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
.................................................................
हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आ. र