धाराशिव जिल्ह्याचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसारखा करणार मे २०२४ पर्यंत उजनी धरणाचे पाणी कौडगाव धरणात येणार

धाराशिव जिल्ह्याचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसारखा करणार


मे २०२४ पर्यंत उजनी धरणाचे पाणी कौडगाव धरणात येणार 

 



धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - पुढच्या वर्षी मे २०२४ पर्यंत उजनी धरणाचे पाणी कौडगाव धरणात येणार हे काम युद्ध पातळीवर सुरू असून जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेबरोबरच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यासही हेच पाणी मिळणार आहे. या योजनेसाठी ११ हजार कोटी राज्य  शासनाने मंजूर केले असून या महत्वकांक्षी वॉटर ग्रीड योजनेमुळे बळीराजाला या उपक्रमातून दिलासा मिळेल असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी दि.४ मे रोजी केले. 

परंडा येथील गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र माने, उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, तहसिलदार रेणुकादास देवणीकर, गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, मुख्य अधिकारी मनीषा वडेपल्ली आदींसह सर्व प्रमुख विभागातील कार्यालय प्रमुख उपस्थित होते.


 पुढे बोलताना डॉ सावंत म्हणाले की, मी जलसंधारण मंत्री असताना कृष्णा व भीमाचं पाणी आपल्या जिल्ह्याला मिळावे यासाठी प्रयत्न केले. नीरा नदीचे पाणी उजनी धरणात आणून उजनीच पाणी कौडगाव येथे येणार असून कृष्णा भीमा निरा कौडगाव या वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामामुळे ८ जिल्ह्यातील ११ धरणे जोडली जाणार आहेत. या कामासाठी मंत्रिमंडळाने ३५ हजार कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटून मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल. तसेच राज्य शासनाने लोकोद्धाराच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. तसेच आणखीन योजना आखण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला व प्रत्येक समाजातील नागरिकांना समान न्याय, सहकार्य देण्याची शासनाची भूमीका असून लोकांच्या उद्धारासाठी हे शासन अहोरात्र प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसारखा करण्याचे मी शब्द देतो याचाच भाग म्हणून भूम, परंडा व वाशी या तालुक्यातील पाणी पुरवठा व रस्ते विकासासाठी १२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हे तीन्ही तालुके जिल्ह्यातील सर्वात सुंदर व सर्व सोयींनी युक्त होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मी

यावेळी डॉ सावंत यांनी सभागृहाच्या परिसरात मांडण्यात आलेल्या वेगवेगळ्या विभागांच्या स्टॉल्सवर भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली येणाऱ्या नागरिकांना प्रत्येक योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, आलेल्या नागरिकांना योजनेची माहिती द्यावी त्यांना येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले.

या तीनही कार्यक्रमात सर्व विभागामार्फत मंजुर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेश पालकमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी नागरिकांनी कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.


 

............................................................


भूम येथे शासन आपल्या दारी या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, शासन योजना आखण्याचे काम करते. तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असते. परंतू विविध योजना वेगवेगळ्या कार्यालयाच्यावतीने राबविल्या जातात. त्या एका ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शासन आपल्या दारी या मोहिमे अंतर्गत जनतेपर्यंत प्रत्येक योजना व त्या योजनेशी संबंधित कार्यालय एकाच ठिकाणी आणून नागरिकांना याचा लाभ देण्याचे या योजने मागचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी  सांगितले. नुकताच भूम नगर परिषदेला २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील विकासकामे अतिशय उत्तम दर्जाचा करून देशातील उत्कृष्ट नगर पालिकांच्या यादीत भूम नगर पालिकेच्या समावेश होईल अशी मला आशा असल्याचे त्यांनी सांगितले. 


............................................................


डॉ.तानाजी सावंत पुढे म्हणाले की, परांडा, भूम आणि वाशी या ठिकाणी अलीकडेच जनता दरबार आयोजित करून सर्वसामान्य माणसाला त्यांच्या तक्रारी मांडण्याची संधी देऊन प्रत्यक्ष त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. यापुढेही अशा प्रकारचे जनता दरबार आणि शासन आपल्या दारी राबविल्या जातील तेव्हा नागरिकांनी अशा संधीचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.


वाशी येथे बोलतांना पालकमंत्री म्हणाले गेल्या एक वर्षापासून राज्य शासनाने योजना जनतेच्या हिताच्या अनेक योजनांना मंजुरी दिली आहे, निर्णयांच्या गतीमाणतेमुळे महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !