कुंभेजा ग्रामपंचायतवर शिवसेनेची सत्ता

कुंभेजा ग्रामपंचायतवर शिवसेनेची सत्ता

परंडा दि.७ (प्रतिनिधी) - तालुक्यातील कुंभेजा ग्रामपंचायतीवर शिवसेना (बाळासाहेब) चा भगवा झेंडा फडकला.
परंडा तालुक्यातील कुभेजा येथील काही दिवसांपूर्वी सरपंच, उपसरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ प्रा तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. पहिल्या सरपंच पदाचा कार्यभार हा दि. ६ जून रोजी संपल्यानंतर नूतन सरपंच म्हणून बुवाजी मिसाळ यांची तर उपसरपंचपदी भुजंग पोपळे यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा भैरवनाथ कारखान्याचे संचालक  धनंजय सावंत, सोनारीचे माजी सरपंच अंगद फरतडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख बालाजी नेटके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख अशोक पाटील, माजी सरपंच कृष्णा कोकाटे, सोसायटीचे चेअरमन भैरु कोकाटे, ॲड लक्ष्मण कोकाटे, शिवाजी कोकाटे, रवि कोकाटे, जितेंद्र पाटील, माजी सरपंच हनुमंत कोकाटे, सुग्रीव कोकाटे, महेश मिसाळ, नागेश मांजरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !