महिला रुग्णालयात आयसीयु व लहान बाळांचा अतिदक्षता विभाग सुरू करावा
महिला रुग्णालयात आयसीयु व लहान बाळांचे अतिदक्षता विभाग तात्काळ सुरु करावे
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - जिल्हाभरातून बाळंतपणासाठी महिला जिल्हा रुग्णालयात येतात. मात्र त्या ठिकाणी आयसीयु सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्या रुग्णांस सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक परेशान होऊन शहरातील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय येथे व्हेंटिलेटर उपलब्ध असून ते आज रोजी देखील सुरु करण्यात आलेले नाही. लहान जन्मलेल्या बाळास स्त्री रुग्णालयात असलेल्या आयसीयु केंद्रामध्ये व्हेंटिलेटर अतिदक्षता विभाग तात्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी एएमआयएमच्यावतीने
एका निवेदनाद्वारे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.