धाराशिव शहरातील चिखलमय रस्त्यांचे मुरुम टाकून मजबुतीकरण सुरु नगर परिषदेच्यावतीने युद्ध पातळीवर डागडुजीच्या कामांना प्राधान्य
धाराशिव शहरातील चिखलमय रस्त्यांचे मुरुम टाकून मजबुतीकरण सुरु
नगर परिषदेच्यावतीने युद्ध पातळीवर डागडुजीच्या कामांना प्राधान्य
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - शहरात भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांमुळे शहरातील सर्व रस्ते खराब झालेले आहेत. या रस्त्यांची करावी यावरून अनेक आंदोलन होत आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातून त्या खराब झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकून त्याची दबाई करण्याची कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहेत.
धाराशिव शहरात भुयारी गटारांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केले आहेत. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून ते निघालेले मटेरियल रस्त्यावरच टाकलेले आहे. त्यातच सलग पाऊस लागल्याने सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यावरुन आंदोलन होत असल्यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातून खराब झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकून त्याची दबाई करण्याची कामे सुरु आहेत.
शहरातील गालिब नगर, मिल्ली कॉलनी, मुकुंद नगर, लक्ष्मी कॉलनी, चंद्रभागा सोसायटी, आनंद नगर, समता कॉलनी, दत्त कॉलनी ८ ते १० भागांतील मजबुती करण केले आहे. तर गणेश नगर, शेरकर वाडगा, साठे नगर, तांबरी विभाग, कुरणे नगर, प्रकाश नगर, जुळजाई नगर, शिवसृष्टी नगर, भवानी नगर, नारायण कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, बार्शी नाका ते बोंबले हनुमान रस्ता अशा १५ ते २० भागांत मुरूम टाकून डागडुजीची कामे सुरु आहेत.
.............................................