वंचित बहुजन आघाडीची कळंब येथे विविध पक्ष, संघटना पदाधिकाराऱ्यांचा जाहीर प्रवेश
कळंब दि.१ (प्रतिनिधी) - येथील पंचायत समितीच्या सभागृहात वंचित बहुजन आघाडीची तालुकास्तरीय बैठक पार पडली.
यावेळी जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, प्रक्तते प्रा.अरविंद खांडके, जिल्हा उपाध्यक्ष ऍड.लक्ष्मण खुणे, कळंब तालुकाध्यक्ष श्रीकांत राऊत, शहराध्यक्ष रसूल खान, युवा आघाडीचे महासचिव धिरज शिंदे आदी उपस्थित होते.
कळंब तालुका हा बहुजन चळवळीचा धाराशिव जिल्ह्यामधील केंद्रबिंदू आहे. या तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीमधील तरुण-युवक अनेक छोट्या मोठ्या पक्ष संघटनांमध्ये काम करतात. सध्याची सामाजिक, राजकीय व राज्यातील देशातील परिस्थिती पाहता या सर्व तरुणांनी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्येच काम करावे. येथील वंचित शोषित पीडित बहुजन समाजासमोर वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा कुठलाही सक्षम पर्याय असू शकत नाही. ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय संपुर्ण देशामध्ये इथल्या शोषित, पीडित, अल्पसंख्यांक व वंचित बहुजन समाजासाठी समाजकारण व राजकारण करणारे दुसरे नेतृत्व नाही. त्यामुळे काळाची गरज ओळखून आता ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करणे व वंचित बहुजन आघाडीमध्येच काम करणे ही गरज लक्षात घेऊन या आढावा बैठकीचे आयोजन ऍड.आबासाहेब पायाळ, डी.टी. वाघमारे, बी.एम. आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, रिपब्लिकन पँथर सेनेचे अशोक कसबे त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीररित्या प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. तरच वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून आपण होऊ घातलेल्या संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण जिंकू असा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी बुथ बांधणीपासून नियोजन करत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्य व सोबतीची अपेक्षा करतो अशी अपेक्षा व्यक्त करीत ही लढाई आपणाला जिंकायचीच आहे असे सांगितले. तर जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी कळंब येथील आंबेडकर चळवळीतील तरुणांनी व नेत्यांनी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जिल्ह्यामधील चळवळीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना दिशा दर्शविणारा ठरणारा असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच ही कळंबमधून सुरुवात झाली असून उद्या संपूर्ण जिल्ह्यामधील छोट्या मोठ्या पक्षांमधील कार्यकर्ते व नेते वंचित बहुजन आघाडी सोबत आल्याशिवाय राहणार नाहीत असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर अनिल हजारे यांनी एकाच विचारधारेवर वेगवेगळ्या मार्गाने काम करताना आपण आपले उचित ध्येय साध्य करू शकणार नाहीत. त्यासाठी आपणा सर्वांना वंचित बहुजन आघाडी या एकाच पक्षाच्या झेंड्याखाली व ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर भविष्यामध्ये भाजप सारख्या पक्षांना रोखायचे असेल तर स्वाभिमानी नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय दुसरा नेता. त्यामुळे आज आम्ही सर्वांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अशोक कसबे, डी.टि. वाघमारे, प्रा.अरविंद खांडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना बी.एम.आव्हाड यांनी उपस्थित जनसमुदाय पाहता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहता ही आजची बैठक यशस्वी झाली असून पदाधिकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे बुथनिहाय बांधणी, बूथ प्रमुखांची निवड व गाव तिथे शाखा या पद्धतीने पुढील काळामध्ये आपण व्यापक पद्धतीने कळंब तालुक्यामधून वंचित बहुजन आघाडी पक्षाची मजबूत बांधणी करु. त्यासाठी आपण तत्पर राहिले पाहिजे असे सांगत ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करूया पुढील काळामध्ये देखील आपल्याला अनेक छोट्या मोठ्या पक्षांमधील पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्यासाठी संपर्क आणि संवाद वाढवावा लागेल असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे परंडा तालुकाध्यक्ष महावीर बनसोडे व मनोज सिंगनाथ यांच्यासह शिवाजीराव कांबळे, उमेश कांबळे, अरून गरड, सुधाकर रणदिवे, उत्तरेश्वर उबाळे, आकाश गायकवाड, प्रशांत धावारे, मनोज गाडे, अरुण कांबळे, संजय सावंत, राहुल गाडे, सुरज सोनके, संतोष सोनवणे, प्रवीण शिंदे, उत्तम सावंत, सुहास शिंदे, अक्षय हजारे, सुरज वाघमारे,