महसूल विभागाची विकासकामांमध्ये महत्वपूर्ण भूमिका - डॉ. ओंबासे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याचा गौरव व गुणवंत पाल्यांचा

महसूल विभागाची विकासकामांमध्ये महत्वपूर्ण भूमिका - डॉ. ओंबासे

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याचा गौरव व गुणवंत पाल्यांचा

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - महसूल विभागाची विकासकामांमध्ये महत्वपूर्ण भुमिका आहे-ही जबाबदारी ओळखून ती यशस्वीरित्या पार पाडावी-विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत सहज व सुलभ पोहोचविण्यासाठी कामाप्रती सकारत्मक दृष्टीकोण विकसित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दि.१ जुलै रोजी केले.

कळंब येथील रायगड मंगल कार्यालयात महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कार्यकरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा डॉ ओंबासे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस उपअधीक्षक एम.रमेश, सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडळकर, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेद्रकुमार कांबळे, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोरे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, भूमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पाटील, विशेष भूसंपादन अधिकारी राजकुमार माने, विशेष भूसंपादन अधिकारी मांजरा प्रकल्प उदयसिंह भोसले, कळंबच्या तहसिलदार मनिषा मेने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे आदींसह सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या काळानुसार स्वता:मध्ये जबाबदारीनुसार बदल केले पाहिजेत. प्रशासनात आपली भूमिका नेहमी प्रशासक, समन्वयक आणि नियंत्रक राहिले पाहिजे अधिकाऱ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये व आपल्याला मिळत असलेल्या वेतनात समाधानी राहून जनतेची सेवा करावी असेही त्यांनी सांगितले.
आपल्या मुला-मुलींना चांगले शिक्षण द्या, पाल्यांचे उच्च शिक्षण हीच आपली खरी कमाई असते. येणाऱ्या पिढीला उत्तम प्रशासन व पारदर्शक सेवा देणे हा त्यांच्या भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी महत्वाची बाब ठरेल. त्यामुळे महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढच्या पिढीचा विचार करून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी तर सूत्रसंचालन वृषाली तेलोरे यांनी व आभार तहसिलदार मनिषा मेने यानी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोमान्य बालगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !