शिक्षण महर्षी गुरुवर्य के.टी पाटील यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

शिक्षण महर्षी गुरुवर्य के.टी पाटील यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस शिक्षण महर्षी गुरुवर्य के.टी पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. १८ ते २० ऑगस्ट दरम्यान फ्लाईंग किडस इंटरनॅशनल इंग्लीश स्कूलच्या मैदानावर करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख उपस्थित होते. तर ऑल इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी व प्रशासकीय अधिकारी तथा जिल्हा टेनिस असोसिएशनचे सचिव आदित्य पाटील, जिल्हा टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अभिराम पाटील, क्रीडा अधिकारी कैलास लटके, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, फ्लाईंग किडचे प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी आदी उपस्थित होते. ही सहावी राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा १७ वर्ष मुले व मुली या गटासाठी असून या स्पर्धेत राज्यभरातील मुलांचे २४ तर मुलींच्या ८ संघांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा ३ दिवस चालणार असून या स्पर्धेचे संयोजक विक्रम सांडसे असून आर.बी. जाधव, इंद्रजित वाले, सुमित राठोड हे या स्पर्धेचे काम पाहत आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !