शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदे कंत्राटी ऐवजी कायमस्वरूपी भरावीत भीम योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांची मागणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदे कंत्राटी ऐवजी कायमस्वरूपी भरावीत

धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील पदभरती बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीऐवजी कायमस्वरूपी पदे भरण्यात यावीत, अशी मागणी बहुजन योद्धा संघटनेच्यावतीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे भीम योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी दि.९ ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील पदभरतीसाठी दि.१ ऑगस्ट २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत शासननिर्णय जारी करण्यात आलेला आहे. या शासननिर्णयाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता गट - अ ते गट - ड मधील एकूण ९८६ पदे निर्मिती करण्यास मान्यता व त्यापोटी येणार्‍या रूपये १००.५७ कोटी इतक्या अंदाजित खर्चास परवानगी देण्यात आलेली आहे. शासननिर्णयात नमूद केल्याप्रमाणे गट - अ ते गट - क मधील नियमित ५२० पदे, त्याचप्रमाणे गट - क मधील ३७ काल्पनिक पदे आणि गट - ड मधील ४२८ कंत्राटी पदे बाह्ययंत्रणेद्वारे अशी एकुण ९८६ पदे चार टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

वास्तविक धाराशिव हा आकांक्षित जिल्हा म्हणून मागास जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट आहे. त्यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात दर्जेदार उपचार मिळावेत याकरिता कंत्राटी पदभरती ऐवजी कायमस्वरूपी पदभरती करणे आवश्यक आहे. कंत्राटी पदभरतीमुळे रूग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर बेरोजगारीमुळे कंत्राटी पदावर काम करण्यास उमेदवार तयार होतील. परंतू तुटपुंज्या पगारावर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण होणार आहे. कंत्राटी कामगाराचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या पुढील भवितव्याचे काय ? हा देखील मोठा प्रश्न आहे. म्हणून शासकीस वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील पदभरती कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी शिंगाडे यांनी

केली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !