एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी योगामध्ये मारली बाजी

एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी योगामध्ये मारली बाजी

  

तुळजापूर दि.२२ (प्रतिनिधी) - तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुलात पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेत यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश  संपादन केले.
या विजेत्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. त्यामध्ये १४ वर्ष वयोगटांमध्ये जानवी क्षीरसागर, ज्ञानेश्वर काळे तर १७ वर्ष वयोगटांमध्ये सोनाली गिरी, प्रतीक्षा काळे, सृष्टी कोळी, प्रविण सुपलकर, महेश राठोड, केतन शिंदे, प्रेमराज विभुते, ज्योतीराम पवार तसेच १९ वर्ष वयोगटांमध्ये साक्षी गायकवाड यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर, प्रणिता यांचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र वैदू, कार्यवाह विवेक आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे व सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !