तलाठी पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

तलाठी पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - तलाठी पदभरती परीक्षा -२०२३ ही परीक्षा १६, १८, १९, २०, २१ आणि २२ ऑगस्ट रोजी तीन सत्रात पवनराजे कॉम्प्लेक्स, २ रा मजला, राजीव गांधी नगर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - सोलापूर रोड या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.
        या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे. परीक्षार्थींना कसलाही अडथळा होऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, रेडीओ, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, गणनायंत्र (कॅल्क्युलेटर) व अशा सर्व प्रकारच्या स्वरुपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येऊ नये यासाठी परीक्षा केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.
               या आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनांस प्रवेशास मनाई राहील. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी,संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना (परीक्षार्थींच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाही. परीक्षा केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश १७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंतवरील कालावधीत या परीक्षा केंद्राच्या परिसरात लागू राहतील. या आदेशाची अवमानना केल्यास भारतीय दंड विधान संहितेचे कलम १८७ नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिले आहेत.
                      

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !