मध्यान्ह भोजन भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवरगुन्हे दाखल करण्याची मागणी

मध्यान्ह भोजन भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर

गुन्हे दाखल करण्याची मागणी 




धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारात संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्यावतीने एका निवेदनाद्वारे आनंद नगर पोलीस ठाण्याच्या फौजदार यांच्याकडे केली आहे. 


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र क्र. २०२२/ उपचिटणीस / एमएजी-५/कावि- १७५९/१७४९/६२/२०२३ दि.२८ एप्रिल रोजी या पत्रान्वये मध्यान्ह भोजन चौकशी समितीनुसार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे हे अध्यक्ष तर सदस्य म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त बी.जी. अरवत, सहाय्यक लेखाधिकारी जिल्हा पुरवठा विभाग, धाराशे हे आहेत, यांनी स्वतः, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या मार्फत चौकशी केली असता फार मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार व अनियमितता झालेली आहे. मध्यान्ह भोजन योजनेसाठी विकासक, ठेकेदार, आस्थापना यांनी मागणी अर्ज केलेले आहेत. ते देखील बोगस असल्याचे चौकशी समितीस आढळून आले आहे. तसेच या चौकशी अहवालामध्ये दाखविण्यात आलेले मजुर व ठेकेदार बोगस आहेत. एवढा मोठा भ्रष्टाचार उघड होवून देखील भ्रष्ट व दोषीं अधिकारी व ठेकेदार हे राजरोसपणे राजाश्रय मिळत असल्यामुळे मोकाट वागत असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारामध्ये वाढ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.‌ त्यामुळे वरील बाबींचा विचार करून व गांभीर्य ओळखून कंत्राटदार, सरकारी कामगार अधिकारी, आस्थापना, ठेकेदार, विकासक यांच्यावर त्वरीत योग्य त्या फसवणुकीच्या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा व भ्रष्टाचारास आळा घालावा. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे. यावर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव आनंद भालेराव, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव यांच्या सह्या आहेत.












Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !