विशेष कार्यकारी अधिकारी मुसळे यांचा सत्कार
विशेष कार्यकारी अधिकारी मुसळे यांचा सत्कार
धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील मुसळे व संग्राम मुसळे यांचा राष्ट्रवादी (अप) काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रा.सुशील शेळके यांच्या हस्ते दि.२२ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी कळंब तालुक्यात सलग २४ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून सोयाबीन व इतर पिके करपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी आस्मानी संकटात सापडले असून त्यांना प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. मुसळे यांनी कळंबचे तहसिलदार मुस्तफा खोंदे यांना तात्काळ फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लवकरच उपमुख्यमंञी पवार यांना सर्व परिस्थितीचा आढावा दिला जाईल व नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी दादा खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर खोसे, अजित घुले, सुहास पांचाळ, विवेक गायकवाड, मनोज पाटील, अमर शिंदे आदी उपस्थित होते.