कळंब शिराढोण येथे जलद कृती बल, पोलीस दलाचे पथ संंचलन
कळंब शिराढोण येथे जलद कृती बल, पोलीस दलाचे पथ संंचलन
धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद मिलाद, दिपावली, आदी सह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत, या दरम्यान कुठल्याही जाती धर्मानमध्ये तेढ निर्माण होवू नये. सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावेत. यासाठी जलद कृती बल (रॅपीड एक्शन फोर्स) कळंब व शिराढोण पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदारासह कळंब व शिराढोण पोलीस ठाणे हद्दीत दि.२७ ऑगस्ट रोजी पथसंचलन करण्यात आले.
समाज विघातक, असामाजिक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मिक असहिष्णुता पसरवून सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येणाऱ्या आगामी काळात कळंब व शिराढोण शहरात साजरा होणारा गणेश उत्सव व नवरात्र उत्सव आणि नजीकच्या काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या शांततेत भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जाव्यात व या दरम्यान समाज कंटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये, त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी, या उद्देशाने उस्मानाबाद जिलह्यातील कळंब व शिराढोण शहरातील विविध भागांतुन जलद कृती दलासह उस्मानाबाद पोलीस दल यांचे संयुक्त पथसंचलन करण्यात आले. यावेळी कळंब शहरातील होळकर चौक- भगवान चौक-विठ्ठल चौक- एस बी आय मेन रोड- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक- जिजाऊ चौक- सुमो चौक- सी एच टी चौक- खटाले चौक अशा संवेदनशिल भागातुन रुट मार्च काढण्यात आला.तसेच यावेळी शिराढोण पोलीस ठाणे हद्दीत शिराढोण शहरातील संभाजी चौक- जैन मंदीर- पाटील गल्ली- गणपती मंदीर- के.एन स्कुल ऐरिया अशा संवेदनशिल भागातुन रुट मार्च काढण्यात आला. व या दरम्याण जनतेशी संवाद साधण्यात आला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखली अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जलद कृती (रॅपीड ऍक्शन फोर्स) दलाचे डेप्युटी कमांडंट विरेंद्र यादव, कंपनी कमाडंर कृष्णकुमार चंद्रा, भूम डिव्हिजनचे उप विभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरामठ, कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश साबळे, शिराढोण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेहरकर यांच्यासह जलद कृती बलाचे ६० जवान व कळंब व शिराढोण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार या पथ संचलनात सहभागी झाले होते.