बालाजी कंट्रक्शनच्या विरोधात शिवसेनेचे भीक मागो आंदोलन

बालाजी कंट्रक्शनच्या विरोधात शिवसेनेचे भीक मागो आंदोलन

लोहारा दि.१८ (प्रतिनिधी) -  शहरातील अंतर्गत विविध विकास कामे चालु आहेत. काही ठिकाणच्या कामाच्या अंदाजपत्रकामध्ये बंदिस्थ नाली आहे. ते काम अंदाजपत्रकानुसार करणे गरजेचे असताना कामे अंदाजपत्रकानुसार न करता नालीवर छत टाकत असताना तेथे राहणाऱ्या नागरीकांकडून लादी घेऊन तेथे छत टाकण्यात आले. तसेच ज्या नागरीकांनी छत टाकण्यासाठी लादी दिली नाही. अशा नागरीकांच्या घरासमोरील नालीवर छत टाकण्यात आले नाहीत. अजूनही काही ठिकाणी हे छत टाकण्यात आले नाहीत. त्यामुळे त्या संस्थेच्या विरोधात शिवसेना  (ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे त्या नालीच्या ठिकाणापर्यत भिक मागो आंदोनल करण्यात आले. लोहारा शहरातील नागरीकांकडून, बाजारपेठेतून या आंदोलणाच्या माध्यमातुन ७०७ रुपये रक्कम गोळा करण्यात आली. ही रक्कम बालाजी कंट्रक्शनच्या पोष्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार म्हणाले की, जेथे नालीवर हे छत टाकण्यात आले नाही. तेथे तात्काळ छत टाकण्यात यावा. तर नागरीकांकडून लादी घेऊन छत टाकण्यात आले. तेथील नागरीकांकडून जे पैसे घेतले आहेत. ते पैसे या संस्थेने तात्काळ परत करावेत. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, नगरसेवक प्रशांत काळे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, माजी ग्रा.प.सदस्य महेबुब गवंडी, युवक कॉंग्रेसचे शहर प्रमुख हरी लोखंडे, माजी ग्रा.प.सदस्य दत्ता स्वामी, माजी वि.का.से.सो. सदस्य रघुवीर घोडके, युवासेना शहरप्रमुख दिनेश गरड, सोशल मिडीया तालुका प्रमुख प्रेम लांडगे, शाखा प्रमुख गोविंद बंगले, महेश बिराजदार, बालाजी माशाळकर, आमिर शेख, अजित घोडके, हामजा खुट्टेपड, बळीराम गोरे, अक्षय सगट, शिवा सुतार, मोहन वचने, तुकाराम वाळके, परमेश्वर चिकटे, बबलु मोमीन, शिवन काडगावे, यांच्यासह  शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !