भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे - डॉ.गोपछडे तालुकाध्यक्षपदी पाटील बिनविरोध


भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे - डॉ.गोपछडे

तालुकाध्यक्षपदी पाटील बिनविरोध

उमरगा दि.२५ (प्रतिनिधी) - भाजपा तालुकाध्यक्ष निवडीसाठी जिल्हाभर बैठक होत असून इच्छुकांची संख्या मोठी आहे. परंतू येथील तालुकाध्यक्षपदी शहाजी पाटील यांची एक मताने बिनविरोध निवड झाली असून ही राज्यातील पहिलीच अशी बैठक असल्याचे मत भाजपा जिल्हा प्रभारी डॉ.अजित गोपछडे यांनी दि.२४ ऑगस्ट रोजी केले.

उमरगा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष निवडीसाठी शासकीय विश्रामग्रहावर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्याची बैठक डॉ.अजित गोपछडे व भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्षपदी शहाजी पाटील यांची बिनविरोध निवडीचा ठराव कार्यकर्त्यांनी मांडला. तर जिल्हाभरातील तालुकाध्यक्ष निवडीवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर पाटील, जिपचे माजी सभापती ऍड.अभय चालुक्य, विनोद गपाट, विधानसभा निरीक्षक राहुल पाटील, प्रवीण पाठक, अनिल काळे, रामदास कोळगे, सतीश देशमुख, इंद्रजित देवकते, गुलचंद व्यवहारे, ऍड.व्यंकटराव गुंड, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, माजी तालुकाध्यक्ष कैलास शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आलूर भागातील विविध पक्षांतील १८ प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी डॉ गोपछडे म्हणाले की, जिल्ह्याचे शेवटचे टोक असल्याने या भागाला जिल्हाध्यक्ष पद द्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे हे पद या भागाला दिले असून आज ही बैठक झाली. मात्र ही निवड बिनविरोध करून नूतन जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी राज्यात वेगळा ठसा निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुका व त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी बुथनिहायआखणी करावी. तर पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसापासून प्रत्येक ग्रामपंचातीत ५ रुग्ण मित्र केल्यास अनेकांना जीवदान मिळणार आहे. राज्यात ५० हजार रुग्ण मित्र करण्याचा भाजपचा संकल्प असल्यामुळे कार्यकर्त्यांनी या रुग्ण मित्रांसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उमरग्याचे माजी नगराध्यक्ष  हंसराज गायकवाड, मुरूमचे माजी नगराध्यक्ष राजू मिनियार. शेखर मुदकना, जकेकूरचे सरपंच अनिल बिराजदार, सिद्धेश्वर माने, उमेश स्वामी, गुलाब डोंगरे, दिलीपसिंह गौतम, प्रशांत माने, अरुण इगवे, युवराज कारभारी, श्रीराम राठोड, पिंटू राठोड, सिद्राम जाधव, अमर वरवंटे, सतीश सरवदे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !