धाराशिव शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाची चाळण झालेल्या रस्ता दुरुस्तीसाठी यंत्रणा लागली कामाला दैनिक यशवंतच्या बातमीच्या दणक्याने बांधकाम विभागाला आली जाग
धाराशिव शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाची चाळण झालेल्या रस्ता दुरुस्तीसाठी यंत्रणा लागली कामाला
दैनिक यशवंतच्या बातमीच्या दणक्याने बांधकाम विभागाला आली जाग
धाराशिव शहरातून राज्यमार्ग जाणाऱ्या राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता या रस्त्याच्या दुरुस्तीला सवती सारखा दुजाभाव करत होते. या संदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच बांधकाम विभागाची यंत्रणा कामाला लागले असून खड्डे बुजविण्यासाठी खडी आणून टाकण्यास सुरुवात केली आहे. याबाबत दैनिक यशवंत या वृत्तपत्रामध्ये दि.२९ जुलै रोजी धाराशिव शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाच्या चाळण झालेल्या रस्त्याकडे पाहणार कोण ? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
धाराशिव शहरातून धाराशिव ते बार्शी, तुळजापूर, संभाजीनगर व औसा असे राज्य मार्ग आहेत. या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून ते दुरुस्त करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना देखील ते याकडे डोळे झाक होत होती. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. तर अनेक ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होत असून अनेकजण या अपघाताचा जखमी झाले आहेत याची बातमी धाराशिव शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गाच्या चाळण झालेल्या रस्त्याकडे कोण पाहणार कोण ? या मथळ्याखाली दि.२९ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. खराब झालेल्या रस्त्यांची डाकूजी करण्यासाठी सर्वत्र खडी टाकण्याचे काम दि.२ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून आम्ही दिलेल्या बातमीमुळे समाधान व्यक्त होऊ लागले आहे.
शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, श्रीपतराव भोसले हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, शरद पवार हायस्कूल, मराठी कन्या प्रशाला आदीसह इतर शैक्षणिक संकुल शहरात असल्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांची सकाळ ८ वाजल्यापासून दुपारी १२ तर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. या रस्त्यावरून बससह इतर मोठी वाहने देखील जातात. त्यामुळे हे खड्डे चुकविताना मोटारसायकल, ऑटो रिक्षा व इतर छोट्या मोठ्या वाहनांचे सतत अपघात होत आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.