आरोग्यदायी निर्णयाबद्दल पालकमंत्री डॉ. सावंत यांचा शिवसेना तालुकाप्रमुख लाकाळ यांनी केला सत्कार
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील आरोग्यसेवा मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना ५ लाख रुपयांर्यंतचा रूग्णालयातील खर्च मोफत होणार आहे. या निर्णयाबद्दल शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ-पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत पुणे येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील सेवा निःशुल्क
करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. यासाठी आरोग्यमंत्री सावंत यांनी आग्रह धरला आहे. सरकारी रुग्णालयातील या सर्व तपासण्या, चाचण्या निःशुल्क करण्याची घोषणा मंत्री सावंत यांनी केली होती. सत्कार करताना भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत उपस्थित होते.