शिराढोण येथील भगवा ध्वज प्रशासकीय पातळीवर बदलण्याची मागणी
शिराढोण येथील भगवा ध्वज प्रशासकीय पातळीवर बदलण्याची मागणी
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील शिराढोण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भगवा ध्वज हा अतिशय जीर्ण झाला असून तो प्रशासकीय स्तरावरून बदलण्यात यावा अशी मागणी शिवसेना (बाळासाहेब) च्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२४ ऑगस्ट रोजी केली आहे.
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भगवा ध्वज अत्यंत झाला असून तो बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. काही स्थानिक आक्षेपामुळे या ठिकाणच्या ध्वजाचे प्रकरण हे विशेष बाब म्हणून सुनावणीसाठी मंत्र्यांच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे स्थानिक शिवप्रेमींना हा ध्वज बदलण्यास अडचणी येत आहेत. या ठिकाणच्या उभ्या असलेल्या ध्वजाची झालेली जीर्ण अवस्था ही महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक व सामाजिक भावनांची टोकाची अवहेलना व अनादर करणारी आहे. केवळ अंतिम निर्णयास होणाऱ्या विलंबामुळे भगव्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी ही अवहेलना संतापजनक व प्रचंड चीड आणणारी आहे. त्यामुळे या संवेदनशिल बाबीचा गांभीर्याने विचार करून मंत्री स्तरावरील प्रकरणाच्या अंतिम निर्णय अधिन राहून प्रशासनाच्या माध्यमातून येथील भगवा ध्वज त्वरीत बदलून घ्यावा. तसेच न झाल्यास ल्यास या संतापजनक प्रकारामुळे समस्त महाराष्ट्रात उद्रेकाची लाट उसळल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, मागासवर्गीय शिवसेना जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, विधानसभा संघटक अमोल पाटील, युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, नितीन पाटील, संतोष पवार, शिवसेना उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, संकेत हाजगुडे, शहर संघटक रणजीत चौधरी, युवा सेना शहर प्रमुख कृष्णा हुरघट , अमर माळी, रवी गिरी, पांडुरंग घोगरे, प्रवीण पवार, अनंत भक्ते, गुणवंत देशमुख, दता तिवारी, नवनाथ सुरवसे, शंकर थोरात, प्रशांत पाटील, अजिंक्य आगलावे, बालाजी सूर्यवंशी, काका खोत, सुनील पाटील, आशिष खोबरे, रोहन गाढवे, गणेश गाढवे, ज्ञानेश्वर ठवरे, शुभम पांढरे, अजिंक्य आगलावे, दिनेश तुपे, गजानन जगताप, देवळालीचे सरपंच अजय सपकाळ, धनाजी साळुंखे, राजेश माळाळे, अक्षय माळी, लखन जिरमिरे, सोमनाथ वावरे, कमलाकर दाणे, शिवसैनिक, युवा सैनिक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.