आ चौगुले यांचा विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कार

आ चौगुले यांचा विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्यावतीने सत्कार 

उमरगा दि.२७ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी व विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल आ ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार दि.२६ ऑगस्ट रोजी करण्यात आला. तसेच  संयुक्त कृती समीती व विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले हा सोहळा आज  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी  महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी संघटना व कृती समितीच्या कामाचा आढावा चित्रफितीच्या स्वरूपात सादर केला. त्यामुळे संघटनांच्या संघर्षाच्या स्मृती जाग्या झाल्यात. स्व शिंदे यांनी संयुक्त लढ्याची मुहुर्तमेढ २०२० वर्षी रोवली त्यामुळेच आज जे यश आपण अनुभवतो तो त्याचाच परिपाक असल्याची भावना अजय देशमुख यांना त्यांच्या मनोगताून व्यक्त केली. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण मागण्या मान्य होणार नाहीत. तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन आ चौगुले यांनी दिले.  या कार्यक्रमामध्ये डॉ नितीन कोळी, मिलींद भोसले, रावसाहेब त्रिभूवन, शशिकांत रोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघाचे महासचिव नरेंद्र घाटोळ यांनी तर सूत्रसंचालन दादाराव चव्हाण यांनी व आभार संजय धाकुळकर मानले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !