बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी३१ ऑगस्टपर्यंत अर्ज पाठवावेत

बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी
३१ ऑगस्टपर्यंत अर्ज पाठवावेत

धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बालशक्ती आणि बालकल्याण पुरस्कार देण्यात येतो. बालशक्ती पुरस्कारासाठी ज्या मुलांचे वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षाच्या आत आहे. त्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी कला, शिक्षण, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांची या पुरस्कारासाठी  निवड केली जाते.
                बाल शक्ती पुरस्कार हा वैयक्तिक आणि संस्था स्तरावर दिले जातात. वैयक्तिक पुरस्कारासाठी मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थास्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. संस्था पूर्णतः शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी. बालशक्ती पुरस्कार सन २०२४ साठी शासनाने अर्ज मागविले आहे. हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.३१ ऑगस्टपर्यंत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही. अंकुश यांनी दिली.
                               

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !