जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्रजी सुरु करण्यात येणार - डॉ ओंबासे

जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्रजी सुरु करण्यात येणार - डॉ ओंबासे

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये यापूर्वी सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू होते. मात्र ते मध्यंतरी काही कारणास्तव बंद करण्यात आले. जिल्ह्यातील पालकांची ते वर्ग पुन्हा सुरू करावेत अशी मागणी होती. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संघटना बरोबर बैठक घेतली असून या बैठकीत पुन्हा सेमी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची विशेष माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी  दिली.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू होते त्यामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजीमध्ये प्रगती होऊ लागली होती. मात्र गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये हे वर्ग बंद करण्यात आले. त्या विरोधात अनेक पालकांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करून ते वर्ग पुन्हा सुरू करण्याची सातत्याने मागणी लावून धरली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी याबाबत शिक्षक संघटनाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, डायटचे प्राचार्य डॉ दयानंद जेटनुरे आदींसह संबंधित अधिकारी व शिक्षण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, दि.१९ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये कमीत कमी एक शिक्षक इंग्लिश माध्यमामधून डीएड व बीएड केलेला असणे आवश्यक असल्याची अट घातली आहे. तर जिल्हा परिषदेची २४० नवीन शिक्षकांची भरती करण्यात येणार असून यामध्ये ५० - ५० टक्के इंग्लिश व मराठी माध्यमाच्या डीएड व बीएड झालेल्या शिक्षकांची भरती करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश हा विषय शिकविला जाणार असल्याची माहिती डॉ ओंबासे यांनी दिली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, सेमी इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय हा मुख्यतः पालक शिक्षक संघाच्या समितीवर अवलंबून आहे. त्यांनी तो निर्णय घेतल्यास सेमी माध्यमाचे वर्ग सुरू करता येतील. तसेच खाजगी इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये इंग्लिश माध्यमामधून डीएड व बीए पूर्ण केलेल्या शिक्षकांनाच शिकविण्यासाठी नियुक्ती दिली आहे किंवा नाही ? याची लवकरच तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्राथमिक शिक्षक महासंघाचे बाळकृष्ण तांबारे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सेमीचे वर्ग सुरू करण्यास कोणत्याही शिक्षक संघटनेचा विरोध नाही. ते वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षक पालक यांच्या समितीला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र जी मोठी गावी आहेत व तेथे दोन वर्ग सुरू आहेत. त्यापैकी एका वर्गात मराठी तर दुसऱ्या वर्गामध्ये सेमी माध्यम सुरु केल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !