आज मराठवाडा मुक्ती संग्राम विशेषाकांचे माधव भंडारी यांच्या हस्ते प्रकाशन
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहिदांना अभिवादन करणारा व या मुक्ती समुक्तीसंग्रामातील लढयाचा आढावा घेणारा सांस्कृतिक वार्तापत्राचा लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा विशेषांकाचे प्रकाशन दि. २५ ऑगस्ट रोजी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ऍड व्यंकटराव गुंड पाडोळीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता पेंढारकर या उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींचा गौरव माधव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम धाराशिव येथील समर्थ फंक्शन हॉल समर्थ नगर येथे सायंकाळी ५-३० वाजता होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.