नवमतदार यादीत विद्यार्थ्यांची नाव नोंदणीसाठी महाविद्यालयांची भूमिका महत्वाची - डॉ. ओंबासे

नवमतदार यादीत विद्यार्थ्यांची नाव नोंदणीसाठी महाविद्यालयांची भूमिका महत्वाची - डॉ. ओंबासे

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - देशात युवावर्ग आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के आहे. यामध्ये नवमतदारांची संख्याही तेवढीच असणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी महाविद्यालयांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दि.२२ ऑगस्ट रोजी केले.
धाराशिव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात नवमतदारांची मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे, अधिसभा सदस्य डॉ.संजय कोरेकर, देविदास पाठक, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, उपकेंद्राचे संचालक डॉ. प्रशांत दिक्षीत, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ.सुयोग अमृतराव, कौशल्य विकासचे रोजगार मार्गदर्शन अधिकारी महम्मद रिजवान, कपूर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी महाविद्यालयांनी योगदान देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राचार्यांनी यासाठी विशेष शिबीरे घेऊन विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नाव नोंदणी करुन घ्यावी. तर यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व तहसील कार्यालयाचीही मदत घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच आज प्रत्येक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आहे. त्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन ऍप डाऊनलोड करुन विद्यार्थी आपली मतदार नोंदणी करु शकतात असे त्यांनी सांगितले. तसेच १०० टक्के नवमतदार नोंदणी करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून अचूक माहिती भरुन घेणे आवश्यक आहे. आधार कार्डनुसार पत्ता आणि जन्म तारीख यादीमध्ये भरणे आवश्यक आहे. तर जिल्हाधिकारी  कार्यालयाकडून  उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विहीत नमुन्यात विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरावी. या माहितीसोबत विद्यार्थ्यांचे (ईपिक) रजिस्ट्रेशन (Epic Registration) असणेही महत्वाचे असल्याचे ओंबासे यांनी सांगितले.
२०२३-२४ हे वर्ष निवडणूकांचे राहणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, या कालावधीत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व नगर परिषद अशा वेगवेगळ्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांमध्ये सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, या हेतूने शासन आणि प्रशासनाकडून मतदार जनजागृती व नवमतदार नोंदणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे. देशातील प्रत्येक नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे. कोणीही मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार नोंदणी विशेष कार्यक्रम दि.१ जूनपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. साधारण दि.१५ ऑक्टोबरपर्यंत मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
                 यावेळी उपजिल्हाधिकारी यादव म्हणाले की, जिल्ह्यात १ हजार ५०३ मतदान केंद्र असून तितकेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बीएलओंच्या माध्यमातून १३ लाख २५ हजार मतदारांपैकी ८ लाख ५० हजार मतदारांच्या घरी जाऊन मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे. हा कार्यक्रम दि.१५ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकेंद्राचे संचालक डॉ. प्रशांत दिक्षीत यांनी तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ.सुयोग अमृतराव यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !