तेरखेडा येथे अडीच लाखाचा गुटखा विक्री करणाऱ्यास पकडले

तेरखेडा येथे अडीच लाखाचा गुटखा विक्री करणाऱ्यास पकडले

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - अवैध गुटखा विक्री करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्या ताब्यातून २ लाख ५८ हजार रुपयांचा अवैध गुटखा येरमाळा पोलीसांच्या पथकाने जप्त केला आहे.
दि.२५ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे येरमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक २५ ऑगस्ट रोजी रोजी २.४५ वाजण्याच्या सुमारास येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल पाटील यांना तेरखेडा येथील पठाण गल्लीमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्या आधारे येरमाळा पोलीसांच्या पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती अवैध गुटखा विक्री करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांने त्याचे नाव अख्तर अब्दुल पठाण, वय २६ वर्षे, रा. पाठाण गल्ली तेरखेडा, ता. वाशी  असे सांगून त्याच्याकडे अधीक चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिल्याने पथकाने त्या घराची पाहणी केली. त्यामध्ये एकूण २२ पोते, प्रत्येक पोत्यात गोल्ड ९००० या कंपनीचे गुटख्याचे ५० पुडे अंदाजे २ लाख २० हजार रुपये पांढरे रंगाचे ३ पोते त्यामध्ये १९० गुटख्‌याचे पुडे असा एकूण २ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा गुटखा साठवण करुन तो गुटखा विक्री करण्यासाठी घरामध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेऊन गुटखा विक्री करणारा अख्तर अब्दुल पठाण याच्या विरुध्द येरमाळा पोलीस ठाण्यात गुरंन २५५/२०२४, भा.दं.वि. सं. कलम- ३२७, २७२, २७३ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनित कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पाटील, पोउपनि बोजगुडे, पोलीस हवालदार कपील बोरकर, पोलीस नाईक गायकवाड, महिला पोलीस नाईक मुळे, पोलीस अंमलदार जाधव यांच्या पथकाने केली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !