पीक विम्याची अग्रीम मंजूर करण्यासह कांदा निर्यात शुल्काचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
- Get link
- X
- Other Apps
पीक विम्याची अग्रीम मंजूर करण्यासह कांदा निर्यात शुल्काचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान झाले असून पीक विम्याची २५ टक्ऊ अग्रीम रक्कम मंजूर करण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढीचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.२५ ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, खरिप हंगामातील सोयाबीन, उडीद, तूर, मका आदींसह सर्व पिके धोक्यामध्ये आहेत. तर पाऊस नसल्यामुळे ती पिके करपून जात आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करून त्यांच्या खात्यावर देण्यात यावी. तसेच सध्या शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून त्यांच्या कोणत्याही मालास भाव मिळत नाही. प्रत्यक्ष मशागतीचे दर, खते, बी-बियाणे, औषधे व पीक काढण्याचा खर्च पाहता केलेला खर्च देखील शेतकऱ्यांच्या हातात काही पडत नाही. तर काही शेतकरी बांधव निव्वळ शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे ते हतबल झाले आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मंजूर करावा अन्यथा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र निषेध रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावर जिल्हाध्यक्ष ऍड धिरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, प्रदेश जनरल सेक्रेटरी शीला उंबरे-पेंढारकर, ॲड दर्शन कोळगे, अमोल शेळके, सरफराज काझी, सिद्धार्थ बनसोडे, आयुब पठाण, सलमान शेख, अशोक बनसोडे, अंकुश पेठे, बालाजी माने, अभिषेक बागल, लियाकत मोमीन, प्रभाकर लोंढे, मुजीब शेख, धनंजय राऊत, संजय गजधने, आरेफ मुलाणी, प्रेमानंद सपकाळ, राहुल गोरे, आनंदराव घोगरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps