स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने ३४९ बचत गटांना १० कोटी रुपयांचे कर्ज वाटप
स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने ३४९ बचत गटांना १० कोटी रुपयांचे कर्जक्षवाटप
धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) - स्टेट बँक ऑफ इंडिया क्षत्रिय का व्यवसाय कार्यालय क्षत्रिय व्यवसाय कार्यालय व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान यांच्यावतीने जिल्ह्यातील ३४९ महिला बचत गटांना १० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बचत गट कर्ज वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यातील ३४९ बचत गटांना १० कोटी रुपये कर्ज मंजुरीचे पत्र स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासकीय कार्यालय नांदेड उपमहाव्यवस्थापक प्रियकुमार सरीगला यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी धाराशिव क्षत्रिय व्यवसाय कार्यालयाचे सहाय्यक महाव्यवस्थापक
नरसिंगकुमार मेहता, नांदेडचे मुख्य व्यवस्थापक शशिकांत फरकाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांच्या आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एसबीआय क्षत्रिय व्यवसाय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक बी शंकर, प्रवीण डोंगरे व जिल्ह्यातील सर्व एसबीआय शाखेतील व्यवस्थापक यांनी सहकार्य केले.