काळेगाव येथील आरोग्य शिबीरात ३९० रुग्णांची तपासणी
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमीत्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये ३९० रुग्णांची विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ६० रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबीराचे उद्घाटन सरपंच शुभांगी भोवाळ, उपसरपंच संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष नागेश भोवाळ, उपाध्यक्ष मल्लीनाथ हाटकर, शाळेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजिनाथ उंबरे, चेअरमन ज्ञानदेव उंबरे, नवनाथ टपले, ग्रा.प. सदस्य मनिषा मुळे, सुमन गडदे, संगिता गडदे, विशाल मुळे, नितीन मुळे, विलास साखरे, सवळामराम जेटीथोर, भिमराव साखरे, बालाजी कांबळे, शाम काटवते आदी उपस्थित होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. अदित्य सुतार, डॉ. अजय घुगे, डॉ.नियाज फारोकी, डॉ. वेदांत रेणाळकर, डॉ. यश सिंग यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, योगेश मारडकर, म़गरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वंयसेविका उषा वारकड यांनी परिश्रम घेतले.