धाराशिव जिल्हा विकासाच्या बाबतीत लातूरच्या पुढे जाईल - मंत्री बनसोडे

धाराशिव जिल्हा विकासाच्या बाबतीत लातूरच्या पुढे जाईल - मंत्री बनसोडे

उपमुख्यमंत्री पवार यांचे आता पर्व सुरू झाले आहे

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्याला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिलेली आहे. तसेच उस्मानाबादची खास करून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या विकासासाठी प्रचंड मोठे मास्टर प्लॅन तयार करून धाराशिवचा विकास सुध्दा लातूरच्या पुढे जाईल. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आता पर्व सुरू झाले असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रिडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२५ ऑगस्ट रोजी केले.
धाराशिव शहरातील सुनील प्लाझा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मंत्री बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, सुरेश बिराजदार, गोकुळ शिंदे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री बनसोडे म्हणाली की, आज देशांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ ते नऊ वर्षे सरकार असून मोदींचा विकासाचा चमत्कार पाहिलेला आहे. ते ज्याप्रमाणे जगात सर्वात वेगाने देशाचा विकास करीत आहेत. त्या पद्धतीनेच महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही भाजप सोबत जाण्याची भूमिका स्विकारली असल्याचे त्यांनी नमूद केले. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आमचे दैवत आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही काम करणार आहोत असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे कर्तबगार उपमुख्यमंत्री असून ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री यांच्या समवेत एकसंघपणे जात आहेत. राज्याचा विकास केंद्रातून निधी आणून करीत असून महाराष्ट्राला विकासात पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धाराशिव येथील क्रीडा संकुल हे पवार यांच्या संकल्पनेतील बारामतीच्या क्रीडा संकुलाच्या धर्तीवर करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व टीम अतिशय जोमाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर या जिल्ह्यातील लोकसभेची जागा महायुतीच्या माध्यमातून लढविली जाईल व महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असे भाकीत त्यांनी वर्तविले. मात्र ही जागा कोणाला सोडायची याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी घेतील असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, मंत्री बनसोडे यांनी जिल्ह्यातील पक्ष बांधणीबाबत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

..............................

राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

मंत्री बनसोडे यांच्या हस्ते युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, धाराशिव तालुकाध्यक्षपदी प्रशांत फंड, शहराध्यक्षपदी सचिन तावडे, महिला तालुकाध्यक्षपदी अप्सरा पठाण, संगिता ढोकळे, मनिषा औटी, सुलोचना जाधव, परंडा तालुकाध्यक्षपदी अमोल काळे, भूम तालुकाध्यक्षपदी रामराजे साळुंके, परंडा तालुका कार्याध्यक्षपदी विजयसिंह मोरे, बिभीषण खुणे, भूम तालुका कार्याध्यक्षपदी दादासाहेब दळवे, परंडा तालुका उपाध्यक्षपदी दादासाहेब बारस्कर, अतुल गोफणे, धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्षपदी मोहन मुंडे, धाराशिव महिला तालुकाध्यक्षपदी अप्सरा पठाण,  सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल जगताप, सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी सुहासराव मेटे, माजी जिल्हा सैनिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मच्छिंद्र क्षिरसागर, जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब पवार, सहसचिवपदी राजाभाऊ जानराव, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी विनोद जाधव, धाराशिव शहराध्यक्षपदी विक्रम कांबळे, डाळींब युवक गट प्रमुखपदी मोतीलाल चव्हाण, वाशी ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी चिदंबर अवधूत, वाशी तालुका उपाध्यक्षपदी विनोद माने, भूम- परंडा- वाशी विधानसभा उपाध्यक्षपदी सुरेश भांडवले यांची निवड करण्यात आली आहे.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !