सारोळा (बु) येथील गणेश रणदिवेची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी काढली मिरवणूक
गणेश रणदिवेची पोलीस दलात निवड झाल्याने गावकऱ्यांनी काढली मिरवणूक
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - तालुक्यातील सारोळा (बु.) येथील गणेश श्रीकांतराव रणदिवे हा राज्य राखीव पोलीस दलात भरती झाला आहे. त्याची गावकऱ्यांनी या वाजत-गाजत व जेसीबीद्वारे गुलालाची उधळून करत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत आ कैलास पाटील हे सहभागी झाले होते.
गणेश श्रीकांतराव रणदिवे हा धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलात भरती झाला आहे. मिरवणुकी दरम्यान महिलांनी ठिक-ठिकाणी औक्षण केले. मिरवणुकीत तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सोमनाथ गुरव, उपसरपंच वैभव पाटील, ग्राप सदस्य तुकाराम रणदिवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ललत लिंगे, उपाध्यक्ष चंद्रकांत मसे, नितीन चंदने, सोसायटीचे माजी चेअरमन निवृत्ती कुदळे, सपोनि बालाजी मगर, हरिश्चंद्र मगर, बंडू रणदिवे, छत्रपती उदारे, सुभाष रणदिवे, श्रीकांत रणदिवे, दिपक रणदिवे, नारायण बाकले, ज्योतीराम रणदिवे, प्रशांत पाटील, राजाभाऊ रणदिवे, मंगेश रणदिवे, प्रसाद मसे, अण्णा मंडोळे, बिभीषण कोल्हे, भैरवनाथ दरेकर, विकास जाधव, समाधान जाधव, चेतन वाठवडे, विकास राऊत, शुभम पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.