सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाची २८ रोजी सुनावणी - डॉ खरमाटे
सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाची २८ रोजी सुनावणी - डॉ खरमाटे
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण इकाई सोलापूरचे महाप्रबंधक यांनी २८ जुलै रोजी वृत्तपत्रांमध्ये परंडा तालुक्यातील रत्नापूर, मलकापूर, अनाळा, साकत (बु), जाखेपिंपरी, दहिवडी, सुरतगांव, सांगवीकाटी व काटगाव या ९ गावांचा ३ A प्रसिध्द केला आहे.
या प्रसिध्दीद्वारे दि.२५ ऑगस्ट रोजी संबंधित तहसिल कार्यालयात सुनावणीसाठी कळविण्यात आले होते. तथापी, इकाई महाप्रबंधक यांनी भूमी राशी पोर्टल प्रशिक्षण दि.२५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणार असल्याचे व या प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे कळविले असल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीची तारीख २९ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. याची सर्व संबंधित भू-धारक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे यांनी केले आहे.