कनगरा येथील विकास कामांचे नितीन काळे यांच्या हस्ते उद्धाटन

कनगरा येथील विकास कामांचे नितीन काळे यांच्या हस्ते उद्धाटन


धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - तालुक्यातील कनगरा येथे आपल्या ग्राम विकास निधीतून १० लाख रुपये गाव अंतर्गत बाजार चौक येथे सिमेंट रस्त्याचे व गावातील मुख्य रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचे भूमीपूजन नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

नागरिकांशी संवाद साधून गावातील अडचणी जाणून घेतल्या. उर्वरित सर्व विकासकामे देखील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नितीन काळे यांनी सांगितले. यावेळी संजय दळवे, महेबुब शेख, श्रीधर इंगळे, विठ्ठल सुरवसे, संतोष कांबळे, व्यंकट धाराव, सचिन इंगळे, विकास गायकवाड, कमलाकर दळवे, वामन दळवे, अण्णा इंगळे, धनंजय तिगाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !