निजाम राजवटीत पायाभूत सुविधा नसल्यामुळे विकास खुंटला - भंडारी

निजाम राजवटी पायाभूत सुविधा नसल्यामुळे विकास खुंटला - भंडारी

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - मराठवाड्यातील तत्कालीन निजाम राजवटीमध्ये मराठी व इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्यास बंदी होती. केवळ मदरसा पद्धतीचे उर्दू शिक्षण त्यावेळेस दिले जात होते. त्यामुळे या भागातील आर्थिक, सामाजिक व राजकीय मागासलेपण वाढले. या भागातील प्रतिभावंत, गुणवंत विद्यार्थी शिक्षणासाठी अन्य भागात गेल्यामुळे व निजाम राजवटीत पायाभूत सुविधा नसल्यामुळे येथील विकास खुंटला असे मत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी  येथे लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा या विशेषांकाच्या प्रकाशन व मुक्ती संग्रामातील सहभागी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या गौरव सोहळ्यात व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. व्यंकटराव गुंड, सुनिताताई पेंढारकर आदी उपस्थित होते.  यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर ,  बुवासाहेब जाधव, शेषराव बनसोडे यांचा शाल, श्रीफळ,  पुष्पहार व विशेष अंकाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना भंडारी म्हणाले की, १५ ऑगस्ट १५४७ ला भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे संपूर्ण स्वातंत्र्य नव्हते तर ते फाटके स्वातंत्र्य होते. कारण गोव्यामध्ये पोर्तुगीज, पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच राजवट व मराठवाड्यात तत्कालीन हैदराबाद स्टेटमध्ये निजाम राजवट होती. या राजवटीतील स्वातंत्र्य चळवळीसाठी झटणाऱ्या तत्कालीन स्वातंत्र्य सैनिकांना तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसने मदत न केल्याने त्या भागातील जनतेस उशिरा स्वातंत्र्य मिळाले. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर भूमिकेमुळे व भारतीय सैन्याने राबविलेल्या ऑपरेशन पोलो मोहिमेमुळे स्थानिक जनतेच्या रेट्यामुळे मराठवाडयास १ वर्ष १ महिन्याने उशिरा स्वातंत्र्य मिळाले. तर गोवा राज्य १४ वर्षानंतर व पाँडेचरी राज्यास १८ वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव यांनी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या व जनतेच्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदानाबाबत माहिती दिली. यावेळी सुनीताताई पेंढारकर यांनी सांस्कृतिक मराठवाडा मुक्ती संग्राम विशेषांकाचे वैशिष्ट्य सांगितले. तसेच ऍड व्यंकटराव गुंड यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणी जागविल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज नळे यांनी तर सूत्रसंचालन ऍड महेंद्र देशमुख यांनी व आभार प्रशांत कावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निखिल शेंडगे, संदीप इंगळे, राजाभाऊ कारंडे, सुजित साळुंके, गणेश इंगळगी, प्रमोद बचाटे, दासोपंत देशपांडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !