भैरवनाथ आयटीआयचे पहिल्याच वर्षी घवघवीत यशचारही ट्रेडचा १०० टक्के निकाल
चारही ट्रेडचा १०० टक्के निकाल
कळंब दि.२१ (प्रतिनिधी) - गेल्याच वर्षी चालू झालेल्या महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व डी. जी.ई.टी संलग्नित शहरातील ढोकी रोडवरील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) पहिल्याच वर्षीचा इलेक्ट्रिशियन, वायरमन, कोपा व वेल्डर्स या चारही ट्रेडचा १०० टक्के निकाल लागला आहे.
इलेक्ट्रिशियनमधून आशिष आवाड ९२.८३ टक्के,गोविंद वावरे ८८.५० टक्के, अमर काळे ८८ टक्के, वायरमनमधून श्रीकांत धाकतोडे ८९.३३ टक्के, प्रीतम हिंगे ८४.५० टक्के, आदित्य गाडे ८२.६७ टक्के, सुमित खंडागळे ८२.६७ टक्के, वेल्डर कोर्समधून- सोनी भांडे ७८.६७ टक्के, तुकाराम मिरगणे ७७.३३ टक्के, प्रतापसिंह मुंडे ७६ टक्के तर
कोपामधून अभिषेक कळेकर ८६.६७ टक्के, उत्कर्ष गरड ८३ टक्के, राणी काळे ८२.६७ टक्के, अंकिता सुरवसे ८२.६७ टक्के या सर्व यशस्वी व प्रशिक्षण संस्थेतील गुणवंत प्रशिक्षणार्थींचे धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने, आयटीआयचे प्राचार्य सुरज भांडे, निदेशक अविनाश म्हेत्रे, सागर पालके, विनोद जाधव, प्रा.श्रीकांत पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, क्रीडा शिक्षक प्रा.संग्राम मोहिते, आदित्य गायकवाड, विनोद कसबे, प्रा.मोहिनी शिंदे, ग्रंथपाल प्रगती धाराव आदींनी अभिनंदन केले आहे.