शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची भाजपची मागणी

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची भाजपची मागणी

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - चालू खरीप हंगामामध्ये तीन आठवड्या

पेक्षा जास्त कालखंडामध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२१ ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पावसाच्या ओढीमुळे पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंता दूर झाले आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे पावसातील खंडामुळे उत्पादनात ५० टक्के होऊन अधिक घट दिसून येत असल्यास २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अत्यल्प पाऊस झाला असून तीन आठवड्यापेक्षा जास्तीच्या या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे. तसेच खरिपाची पिके नगदी उत्पन्न देणारी असल्यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मुख्यतः याच पिकावर अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांच्या नुकसानी पोटी तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. तर आज दि.२१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये खरीप २०२३ मधील पावसातील खंडामुळे  झालेल्या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपनीला आदेशित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रेवणसिद्ध लामतुरे, नेताजी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, नामदेव नाईक, राजकुमार पाटील, सुनील काकडे, पांडुरंग लाटे, रोहित देशमुख, संदीप इंगळे, अभय इंगळे, अमोल राजेनिंबाळकर, नानासाहेब कदम, अर्जुन पवार, मुराद पठाण, बालाजी नांदे, नरेंद्र वाघमारे, विनायक कुलकर्णी, शेषराव उंबरे, किशोर पवार, विनोद निंबाळकर, संजय लोखंडे, अतुल चव्हाण, शेषराव चव्हाण, गणेश माटे आदींसह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !