पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्या उपस्थितीत परंडा येथे शिवसेना पदाधिकारी व निराधारांचा मेळावा पडला पार
पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांच्या उपस्थितीत निराधारांचा मेळावा पडला पार
परंडा दि.८ (प्रतिनिधी) - येथील राजधानी फंक्शन हॉलमध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळावा, संजय गांधी निराधार योजनेचे व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ योजना, अपंग अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य प्रा. गौतम लटके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता साळुंखे, संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष जाधव, गोपने, शिवसेना युवा तालुकाप्रमुख राहुल डोके, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य गुलाबराव शिंदे, ऍड सुभाषराव मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, अपंग संघटनेचे सदस्य दत्ता रणभोर, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, जाकिर सौदागर, समीर खान, पठाण, सतीश मेहर, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाले, की मी सामान्य जनतेचे मनापासून हृदयात नाव करण्यासाठी काम करीत असून भूम परंडा व वाशी मतदार संघात मे २०२४ पर्यंत कृष्णा खोरे योजनेचे पाणी आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कार्यक्रमात त्यांनी माजी लोकप्रतिनिधींवर वार तर शासकीय अधिकाऱ्यांवर व पत्रकारांवर फिरकी घेऊन चांगलीच कान उघडणी केली. कार्यक्रमात शेतकरी व योजनेचे संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते