तांत्रिक वीज कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेची १० एकर जागेची अध्यक्षांनी परस्पर केली विक्री गुन्हा दाखल करण्याची सभासदांची मागणी

तांत्रिक वीज कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेची १० एकर जागेची अध्यक्षांनी परस्पर केली विक्री

गुन्हा दाखल करण्याची सभासदांची मागणी

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - तांत्रिक वीज कर्मचारी व इतर कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. उस्मानाबाद या संस्थेची १९ एकर जमीनीची (मालमत्ता) अध्यक्षांनी परस्पर विक्री केली आहे. त्यामुळे संस्थाचालकावर पुन्हा दाखल करण्याची मागणी सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२१ ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तांत्रिक वीज कर्मचारी व इतर कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. उस्मानाबाद या संस्थेची स्थापना १९९५-९६ साली करण्यात आली आहे. या संस्थेमध्ये १८६ सभासद असून ही संस्था डीडीआर कार्यालयात नोंदणी केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव कोंडीबा बचाटे यांनी सर्वे नं. ३८८ मधील १० एकर क्षेत्राचा सातबारा हा तांत्रिक वीज कर्मचारी व इतर कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उस्मानाबाद व संस्थेचे अध्यक्ष, ज्ञानदेव कोंडीबा बचाटे यांच्या नावे आहे. ही जमीन दि.३ जून २०२२ रोजी आयेशा इम्रान शेख यांना ०.८० आर तर जाकिया बेगम काशीम शेख यांना १ हेक्टर २० आर तसेच शेख इम्रान अहमद शेख हुसेन यांना १ हेक्टर व शेख हुसेन यांना १ हेक्टर ०२ आर या ४ व्यक्तींना संस्थेच्या व सभासदांच्या मालकीची जमीन एकाही सभासदाच्या परवानगीशिवाय. विशेष म्हणजे सर्वांना अंधारात ठेवून परस्पर विक्री करून दस्त केलेला आहे. तर याबाबत सभासद बचाटे यांना भेटण्यासाठी गेल्यावर त्यांनी शिवबा करून भाषा वापरून जमीन खटकास विकली आहे याबाबत तुम्ही काही करू शकत नाहीत असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ४० ते ५० लाख रुपये लाच देऊन हा व्यवहार पूर्ण केला आहे. या जमिनीवर सध्या विकास काम चालू झाले असून ते तात्काळ बंद करून कायदेशीर कारवाई करावी व गुन्हा दाखल करून सर्व सभासदांना त्यांची मालमत्ता परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी प्रा भालचंद्र हुच्चे, महेंद्र बिदरकर, शेषराव खडके, मुरली रंगदळ, दिलीप सराव, नवनाथ सराव, गणेश सराव, संतोषकुमार मोदाणी, सुनिल गोसावी, रामभाऊ शेरकर, जितेंद्र कापसे, अल्लाउद्दीन शेख, मारुती राऊत, गणपती पाटील, बाळासाहेब साठे, एकनाथ मगर, आत्मलिंग उंबरे, बाबासाहेब तीर्थकर, चणबस फुटाणे, दिलीप कांबळे, लहू खडके, शशिकांत सदावर्ते आदींसह इतर सभासदांच्या सह्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !