धाराशिव ते कन्याकुमारी सायकल प्रवार करणाऱ्या धाडसी तरुणांचा सत्कार
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद व हाफ मॅरेथॉन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने १७ तरुणांनी धाराशिव ते कन्याकुमारी असा १३६० कि.मी. सायकल प्रवास पुर्ण करुन नवा इतिहास रचला आहे. त्यात रोटरी क्लब उस्मानाबादच्या १२ सदस्यांचा सहभाग होता. दि ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान हा प्रवास केला होता. या प्रवासात त्यांनी ठिकठिकाणच्या रोटरी क्लबला सदिच्छा भेटी दिल्या. रोटरी क्लब उस्मानाबादच्यावतीने दि. २० ऑगस्ट रोजी जे.एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालयात या सर्व सायकल वीरांचा मानचिन्ह व शाल देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी अतिथी म्हणून आयर्नमॅन शाम शिंदे यांच्यासह हाफ मॅरेथॉनचे गिरीश अष्टगी, रोटरी क्लब उस्मानाबादच्या अध्यक्षा रो. डॉ. अनार साळुंके, सचिव रो. डॉ. मिना जिंतुरकर आदी उपस्थित होते. प्रस्ताविक डॉ. अनार साळुंके यांनी शाम शिंदे यांची ओळख रविकांत शितोळे यांनी करुन दिली. यावेळी सायकलवीर रो. रणजित रणदिवे, रो. सुरज कदम व प्रदिप खामकर, रुपाली रणदिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी प्रांतपाल व क्लब ट्रेनर रो. रवींद्र साळुंके यांनी समारोप केला. सूत्रसंचालन व आभार रोटरीचे सचिव रो. डॉ. मिना जिंतूरकर यांनी मानले.