ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पारंपारिक हलगी वाद्य लावायचेच

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पारंपारिक हलगी वाद्य लावायचेच

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - कुठलाही उत्सव असला की हल्ली कर्ण कर्कश व संपूर्ण परिसर हादरवून सोडणाऱ्या प्रचंड मोठ्या आवाजाचे डीजे लावले जातात. त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. तो डीजे ज्या वाहनामध्ये आहे. ते वाहन रस्त्यावर चालण्यासाठी असलेले विद्युत व केबल कनेक्शन सतत हातामध्ये काठी घेऊन बाजूला सारण्याची व्यवस्था करावी लागते. तसेच त्या डीजेसाठी विद्युत किंवा जनरेटरची स्वतंत्र यंत्रणा असावी लागते. एवढे सर्व सोपस्कार केले तरीही समाधान मिळत नाही. मात्र पारंपारिक हलगी वाद्याने जमिनीवरची सर्कस साकारून डोळ्याचे पारणे फेडेलच. शिवाय शारीरिक कसरती काय असतात याचा देखील आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला खाली डीजे, बँजो बाजा ऐवजी फक्त आणि फक्त हलगी वादक निवडण्याची गरज आहे.

धाराशिव येथील राष्ट्रवादी (अप) काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील समर्थ हलगी संघ लावण्यात आला होता. त्यांनी जरूर ३५ हजार रुपये घेतले असतील. मात्र त्यांचे वादन व कला पाहून वस्तीतच नाही तर पन्नास हजार रुपये दिले तरी अपुरेस पडतील असा आपल्याला पुन्हा पुन्हा वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण यांनी ज्या कसरती केल्या त्या एखाद्या मल्ल व सर्कसमधील कलाकारांना देखील लाजवेल अशाच एकापेक्षा एक अदाकारी करून त्यांनी उपस्थित त्यांची मने जिंकली.
यामध्ये बाबाजी कांबळे तानाजी लोंढे उमाजी कांबळे अभंग थोरात शेखर लोंढे जीवन कांबळे गणेश थोरात विशाल पारसे सोनू शिंदे शंकर माने यादव कांबळे प्रशांत पारसे राहुल गेजगे सोमनाथ गेजगे पोपट वाघमारे मारुती कांबळे यांनी रणहलगी वाजवीत पाहणाऱ्यांच्या पसंतीला उतरण्याचे काम केले.

आपल्या भागातील एखादा लग्न सोहळा, सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक व महापुरुषांच्या जयंत्या यासाठी हलगी संघ आणायचा असेल तर तानाजी लोंढे मो.नं. - ९६३७३७४६१३ व बाबाजी कांबळे मो.नं. - ९७६३३१३५३५ यांच्याशी आवर्जून संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !