तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण पडले पार

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण पडले पार

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५ दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि.३१ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व युवक युवतीही ऑनलाईन सहभागी झाले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच असा होता की, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबरच डिजिटल उद्योजकता समजावी व आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे डिजिटली उद्योग, व्यवसाय करता यावा, या उद्देशाने धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि या कंपनीने सुशिक्षित बेरोजगार, तरुणांना तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे डिजी मार्ट मॉडेल विकसित केले आहे. ग्रामीण भागातील पशुपालकांना डिजिटली दर्जेदार वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे डिजी मार्ट मॉडेल अधिक फायदेशीर ठरले आहे. या डिजी मार्टच्या माध्यमातून कित्येक ग्रामीण भागातील तरुण युवकांना तसेच विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. या डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते पार पडले. तसेच डिजिटल उद्योजकता या कार्यक्रम दरम्यान, डिजिटल व्यवसाय व संधी, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल प्रमोशन, डिजिटल बिजनेस स्ट्रॅटेजी, रोजगार निर्मितीचे धेनू डिजि मार्ट मॉडेल यासारख्या विविध विषयावर अमित काळे, दिनेश खलाटे, प्रतीक काटकर, ज्ञानेश्वर काशीद, उदयसिंह दळवी, धेनू कंपनीचे कार्यकारी संचालक, संतोष खवळे व डिजिटल बिजनेस मॅनेजर नितीन पिसाळ आदींचे मार्गदर्शन लाभले.

 या कार्यक्रम दरम्यान डिजिटल उद्योजकता या विषयावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय स्तरावर नेमणूक झालेले प्रथम स्तरावरील सहभागी राम खिल्लारे, समाधान रसाळ, नागेश पाठक द्वितीय स्तरावरील सहभागी- ज्ञानेश्वर शेरकर, अभिषेक जाधव, उस्मान शेख व तृतीय स्तरावरील सहभागी- रझवी अहमद व नयन कापसे या आठही स्पर्धकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सहा हजार रुपये किंमतीचा डिजि मार्ट रिटेलर प्लॅनचे पारितोषिक वितरण तेरणा कॉलेजचे प्राचार्य व सहयोगी प्राध्यापक तसेच धेनू  कंपनीचे डिजिटल बिझनेस मॅनेजर, श्री. नितीन पिसाळ व डिजिटल मीडिया मॅनेजर, सूरज खवळे यांच्या हस्ते दि.२२ ऑगस्ट रोजी पालक मेळाव्या दरम्यान वितरण करण्यात आले.
तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, ट्रस्टी आ राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील, तेरणा ट्रस्टचे समन्व्यक प्रा. गणेश भातलवंडे, ट्रैनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अशोक जगताप  व सर्व कर्मचाऱ्यांनी  विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.अशोक जगताप यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धेनूची सर्व टीम व तेरणा कॉलेजमधील विविध विभागांचे प्राध्यापकांचे विशेष सहकार्य लाभले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !