जुनोनी येथील वर्षावास धम्म प्रवचनास प्रतिसाद

जुनोनी येथील वर्षावास धम्म प्रवचनास प्रतिसाद

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील जुनोनी येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
धाराशिव तालुक्यातील जुनोनी येथे मिलिंद बुद्धविहार व सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रमाचे उद्घाटन पु. भन्ते सुमेधजी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष विजयमाला धावरे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा संघटक विजय बनसोडे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे आदी उपस्थित होते. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर सामूहिक पंचशीला घेण्यात आली. तसेच भन्ते सुमेधजी यांनी धम्मदेसना दिली. यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष शिलाताई चंदनशिवे, जिल्हा संघटक मीनाताई लागडे, संरक्षण सचिव सचिन दिलपाक व युवराज पौळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्कार सचिव आदिनाथ सरवदे, कार्यालयीन सचिव महादेव ऐडके, दत्ताभाऊ सोनवणे, सुनील संकपाळ, अंकुशराव नटराज, दाजी बनसोडे, लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सरवदे यांनी तर उपस्थितांचे आभार श्याम सोनवणे यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सोमनाथ सरवदे, धनाजी सोनवणे यांच्यासह सिद्धार्थ तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपासक व उपासिका यांच्यासह पंचक्रोशीतील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !